उत्सव चौकाच्या सौंदर्याला बाधा

उत्सव चौकाच्या सौंदर्याला बाधा

खारघर, ता.२३ (बातमीदार): सिडकोने खारघरमध्ये उभारलेल्या उत्सव चौक आकर्षक वास्तू म्हणून ओळख झाली आहे. मात्र, या चौकाच्या सध्या डिजिटल फलक लावले जात आहेत. त्यामुळे उत्सव चौकाच्या सौंदर्याला बाधा निर्माण होत असून हे फलक काढण्याची मागणी स्थानिकांकडून पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
सिडकोमध्ये प्रवेश करताच प्रथम उत्सव चौक ही सुंदर वास्तू नजरेस पडते. विशेष म्हणजे, गुगलवर खारघर सर्च करताच सिडकोने उभारलेल्या उत्सव चौक शिल्पाची छबी समोर येते. ही वास्तू नवी मुंबई आणि पनवेल शहरातील प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना सेल्फी घेण्याचा मोह होत असतो. अशातच पालिकेने उत्सव चौकाकडून सेंट्रल पार्ककडे जाणाऱ्या रस्त्याचा कडेला एका एजन्सीला डिजिटल फलक लावण्याची परवानगी दिली आहे. मात्र, उत्सव चौकाच्या परिसरात लावण्यात आलेल्या डिजिटल फलकांमुळे सुंदर वास्तूची छबी घेताना परिघात बाधा येणार आहे. त्यामुले उत्सव चौकात लावलेले फलक पालिका प्रशासनाने हटवावे, अशी मागणी भाजपचे खारघर शहर उपाध्यक्ष संजय घरत यांनी केली आहे.
------------------------------------
रस्त्याच्या कडेला मातीचे ढिगारे
उत्सव चौक ते सेंट्रल पार्ककडे जाणाऱ्या रस्त्याचा कडेला मोठ्या प्रमाणात डिजिटल फलक झळकत आहे. फलकाच्या जाहिरातीमुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडत आहे. मात्र, हे फलक लावताना केलेल्या खोदकामाची माती तशीच पडून आहे. त्यामुळे स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करीत असताना फलकासाठी खोदकाम केलेल्या मातीचे ढिगारे रस्त्याच्या कडेला असल्यामुळे नाराजी आहे.
-----------------------------
या फलकांसाठी परवाना विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे माहिती घेऊन पुढील उपाययोजना केली जाईल.
-जितू मढवी, प्रभाग अधिकारी, खारघर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com