Wed, June 7, 2023

अडवली भुतवलीजवळ अज्ञात महिलेचा मृतदेह
अडवली भुतवलीजवळ अज्ञात महिलेचा मृतदेह
Published on : 23 March 2023, 12:16 pm
नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) ः महापे-शिळफाटा येथील अडवली भुतवली गावालगतच्या जंगलामध्ये बुधवारी (ता. २३) सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेच्या डोक्यात सिमेंट काँक्रीटचा दगड घालून तिची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून मृत महिलेची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे.
मृत महिला अंदाजे ३० ते ३५ वयाची आहे. अडवली भुतवली गावच्या हद्दीतील महापे शिळफाट्याकडून सत्ती देवी या गावदेवी मंदिराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत झुडुपांमध्ये हा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. महिलेची हत्या करणाऱ्या अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.