आग्रावला शिडांच्या होड्यांत भरलाय वारा

आग्रावला शिडांच्या होड्यांत भरलाय वारा

रेवदंडा, ता. २३ (बातमीदार)ः अलिबाग तालुक्यातील चौलमधील आग्राव म्हणजे पाड्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी कुंडलिकेच्या खाडीत शिडांच्या होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यत बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असल्‍याने एकप्रकारे जत्रोत्‍सवच साजरा होतो.
दर्यासागर मित्र मंडळाच्या वतीने यंदा सुभाष ढेबरी यांच्या स्मरणार्थ स्‍पर्धा भरवण्यात आल्या होत्या. आग्राव जेटीवरून स्‍पर्धेला सुरुवात झाली. शर्यंतीत होडीवरील तांडेल महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आग्रावमधील हरिश्चंद्र शेट्टी यांच्या मालकीची हिरकणी होडीने गुरुवारी झालेल स्‍पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. तर कोर्लईतील संजय पाटील यांच्या मालकीची कमलावती ही होडी दुसरी आली. यावर नरेश वरसोलकर हे तांडेल होते. अभिजीत अधिकारी व जयेंद्र वरसोलकर, आग्राव या दोघांच्या मालकीची लक्ष्मीने तृतीय क्रमांक पटकावला. त्‍यांच्या होडीवर प्रफुल्ल अधिकारी हे तांडेल होते.
शर्यती पाहण्यासाठी सुमारे स्‍थानिकांसह, पर्यटक व चाकरमान्यांनी मोठी गर्दी केली होती. एकवीरा देवीच्या जय जयकार करीत आणि ढोल-ताशांच्या गजरात शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड. आस्वाद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शर्यतींना सुरुवात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com