केबल चालकांचा ‘झी’ वाहिन्यांवर बहिष्कार

केबल चालकांचा ‘झी’ वाहिन्यांवर बहिष्कार

मुंबई, ता. २३ : झी नेटवर्क आणि केबलचालक यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. झी नेटवर्क आणि केबल नेटवर्क यांच्यामध्ये दर वर्षी आर्थिक करार होत असतो; परंतु हा करार लांबल्यामुळे केबलचालकांनी झी वाहिन्यांचे प्रसारण गेला महिनाभर बंद केले आहे. त्यामुळे प्रेक्षक वर्गामध्ये नाराज पसरली आहे.

झी नेटवर्कच्या विविध वाहिन्यांचे इन, हॅथवे, डेन, जीटीपीएल या केबल नेटवर्कवरून प्रसारण केले जाते. त्याबाबतीत झी आणि केबल नेटवर्क यांच्यामध्ये आर्थिक करार होतो. तो करार यावर्षी अद्यापही झालेला नाही. झीतर्फे याबाबतीत कोणतेच पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे झी वाहिन्यांचे प्रसारण करणाऱ्या केबल नेटवर्कनी प्रसारण गेला महिनाभर थांबविले आहे. झीने आपल्या बुकेतील काही वाहिन्या वेगळ्या काढून त्याची नवीन कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीचा आणि केबल नेटवर्कचा आर्थिक करार होणे अपेक्षित होते. तोदेखील झालेला नसल्याचे समजते. त्यामुळे केबलचालकांनी झीच्या वाहिन्यांवर बहिष्कार टाकला आहे.

एका केबलचालकाशी याबाबतीत संपर्क साधला असता त्याने नाव न छापण्याच्या अटीवर या वृत्तास दुजोरा दिला आहे. केबल नेटवर्क आणि झीचा होणारा करार लांबणीवर पडत चाललला आहे. त्यामुळे सध्या तरी झीच्या वाहिन्यांचे केबल नेटवर्कवरील प्रसारण बंद केले आहे. याबाबतीत झीबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com