बेकायदा मशिदींकडे मनसेचा ‘मोर्चा’

बेकायदा मशिदींकडे मनसेचा ‘मोर्चा’

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ ः माहीम मजारनंतर मनसेने आता मुंब्य्रातील बेकायदा मशिदींकडे आपला मोर्चा वळवला आहे. मुंब्रा देवीच्या पायरीपासून ते बायपासपर्यंत सराकारी जमिनीवर असंख्य मशिदी उभ्या राहिल्या असल्याचे फोटोसह निवेदन मनसेने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच, या अनधिकृत मशिदींवर १५ दिवसांत कारवाई न झाल्यास त्या परिसरात मंदिर उभारू, असा इशारा मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी स्क्रीनवर माहीमच्या समुद्रात एका बेटसदृश्य जागेत एक मजार तयार करण्यात आल्याचा व्हिडिओ दाखवला होता. त्यानंतर आज त्या बांधकामावर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली. राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केल्यानंतर ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंब्रा येथील डोंगरात वनखात्याच्या अखत्यारीतील जागेवरील अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. याच डोंगरावर मुंब्रा देवीचे मंदीर आहे. पारसिक डोंगराचा संपूर्ण भाग वन विभागाच्या अखत्यारित येत आहे. या मंदिराच्या पायथ्यापासून ते मुंब्रा बायपास टोलनाक्यापर्यंत काही लोकांकडून दर्ग्याची अनधिकृतपणे बांधकामे करण्यात आली असल्याची माहिती अविनाश जाधव यांनी मिळवली आहे. या दर्ग्याची बांधकामे करण्यामागे वनविभागाची जागा हडप करण्याचा उद्देश प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com