पाऊण कोटी महिलांचा आठवड्याभरात प्रवास

पाऊण कोटी महिलांचा आठवड्याभरात प्रवास

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : प्रवासात ५० टक्के सवलत दिल्याने आठवड्याभरात राज्यभरातून ७६ लाखांहून अधिक महिलांनी एसटीतून प्रवास केला. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून धावणाऱ्या एसटींमधील महिला प्रवाशांची संख्याही वाढते आहे. त्यामुळे महिला प्रवाशांचा सोयीसाठी एसटी महामंडळ लवकरच रेल्वे, बेस्टप्रमाणे ‘महिला स्पेशल’ एसटी चालविण्याचा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

राज्य सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सर्व बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. १७ मार्च २०२३ पासून या योजनेची अंमलबजावणी राज्यात होऊ लागली. योजनेच्या पहिल्या दिवसापासूनच या सवलतीचा पुरेपूर फायदा महिलांनी घेतला. त्यानुसार १७ ते २३ मार्चपर्यंत राज्यभरातून ७६ लाख ०३ हजार ०२२ महिलांनी प्रवास केला. ज्यामधून महामंडळाला १९ कोटी ९७ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. आता इतकाच महसूल राज्य सरकारला एसटी महामंडळास द्यावा लागणार आहे.

शहरात चांगला प्रतिसाद!
एसटी महामंडळाच्या ५० टक्के सवलतीचा पुरेपूर लाभ शहरातील महिलांनीही घेतला. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ लाख २३ हजार २५८ महिलांनी या कालावधीत एसटीतून प्रवास केला. मुंबई महानगर क्षेत्रात मुंबई व ठाणे विभागाच्या बस धावतात. सुमारे ४० ते ४२ मार्गावर दिवसभरात एसटीच्या एक हजार फेऱ्या होतात. भविष्यात या मार्गावर महिला प्रवाशांच्या माध्यमातून एसटीला चांगले उत्पन्न मिळू शकते. वाढती महिला प्रवासी संख्यात लक्षात घेऊन एसटी महामंडळ ‘महिला स्पेशल’ एसटी चालविण्याचा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहेत.

आठवड्याभराचा आढावा
विभाग महिलाची संख्या
मुंबई - ८४ हजार ५५९
ठाणे - २ लाख २२ हजार १६१
पालघर - २ लाख ८३ हजार ५९४
रायगड - २ लाख ६२ हजार २४३
रत्नागिरी - ३ लाख ७० हजार ५३९
सिंधुदुर्ग - २ लाख १६२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com