पश्चिम रेल्वेची १५८ कोटींची दंड वसुली

पश्चिम रेल्वेची १५८ कोटींची दंड वसुली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : पश्चिम रेल्वेने गेल्या वर्षभरात २७.७० लाख विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करत तब्बल १५८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय केवळ दोन तिकीट तपासणीसांच्या प्रवासी तपासणीतून २ कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय सेवा, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी करते. विनातिकीट प्रवास आणि इतर अनियमिततेमुळे होणाऱ्या अशा महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. एप्रिल २०२२ ते फेबुवारी २०२३ या कालावधीत विनातिकीट/अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण २३.७० लाख प्रकरणे आढळून आली. या प्रकरणांमधून १५८.२८ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ६८ टक्क्यांनी वाढल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

२ कोटींची दंडात्मक वसुली
चर्चगेट आणि राजकोट येथील भरारी पथकात कार्यरत असणाऱ्या दोन तिकीट तपासणीसांनी गतवर्षी विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. राजकोट विभागातील के. डी. ओझा आणि चर्चगेट येथील जाहिद कुरेशी या मुख्य तिकीट निरीक्षकांनी अशा प्रवाशांवर कारवाई करत २ कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. यामध्ये अहमदाबाद विभागातील तिकीट परीक्षक यांनी १७,८०६ प्रकरणांमधून ९३.४७ लाख रुपये दंड वसूल केला आहे; तर अहमदाबाद विभागातील महिला तिकीट तपासणीस शैला तिवारी यांनी ७,२९३ प्रकरणे शोधून ५४.७० लाख दंड वसूल केला आहे. चर्चगेट येथील गीताबेन वसावा यांनी ७,०८५ प्रकरणांमधून ५१.१९ लाख दंड वसूल केल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com