क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती
क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती

क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २५ (बातमीदार) ः मानखुर्द-गोवंडी परिसरात शुक्रवारी (ता. २४) जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विविध सामाजिक संस्था तसेच पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोवंडीच्या शिवाजीनगर येथे सेव्ह शिवाजी नगर फाऊंडेशन व जिल्हा क्षयरोग कक्षाच्या वतीने क्षयरोगाशी लढत असलेल्या रुग्णांना प्रथिनांची पावडर व दूध वितरित करण्यात आले. मानखुर्दमध्ये जनजागृती विद्यार्थी संघाच्या पुढाकाराने पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.
क्षयरोगाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त जनजागृती करण्याच्या उद्देशाने जनजागृती विद्यार्थी संघ या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेत विविध सभा संघटना, पालिकेचे आरोग्य केंद्र, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र तसेच सिद्धार्थ महाविद्यालयाच्या सहकार्याने जनजागृती केली. या अंतर्गत रॅली व पथनाट्यचे सादरीकरण करत माहिती पत्रकांचे वाटप केले. तसेच नागरिकांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी चौक सभांचेदेखील आयोजन करण्यात आले होते. ‘नशा करू नका, टीबीला जवळ आणू नका’ असा संदेश देण्याचा प्रयत्न या आयोजनातून करण्यात आला.