मध्य रेल्वेवर विशेष गाड्यांचा विस्तार

मध्य रेल्वेवर विशेष गाड्यांचा विस्तार

मुंबई, ता. २५ : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सोलापूर-अजमेर आणि साईनगर शिर्डी-ढेहर का बालाजी या दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्र. ०९६२८ सोलापूर-अजमेर सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस १३ एप्रिल २०२३ ते १५ जून २०२३ पर्यंत चालविण्यात येईल. ट्रेन क्र. ०९६२७ अजमेर-सोलापूर सुपरफास्ट स्पेशल १२ एप्रिल २०२३ ते १४ जून २०२३ पर्यंत चालविण्यात येणार आहे. ट्रेन क्र. ०९७४० साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल १६ एप्रिल २०२३ ते ११ जून २०२३ पर्यंत चालविण्यात येईल. ट्रेन क्र. ०९७३९ साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल १४ एप्रिल २०२३ ते ९ जून २०२३ पर्यंत चालविण्यात येईल. या गाड्यांचे थांबे, वेळा आणि संरचनेत कोणताही बदल झालेला नाही. या विशेष गाड्यांचे आरक्षण शनिवारपासून (ता. २५) सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com