मुंबई महापालिकेत तीन कोटींचा भ्रष्टाचार

मुंबई महापालिकेत तीन कोटींचा भ्रष्टाचार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबई महापालिकेत मागील अनेक वर्षांपासून तब्बल तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला. कोलकात्यामधील २७ कंपन्यांच्या माध्यमांतून मुंबईकरांच्या पैशांची लूट सुरू आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक अथवा ईडीकडून चौकशी करावी, अशी मागणी साटम यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली.
प्रश्नोत्तराच्या तासामध्ये बोलताना अमित साटम यांनी सांगितले की, देशात अनेक घोटाळे झाले आहेत; परंतु त्यापेक्षा मोठा घोटाळा मुंबई महापालिकेत झाला आहे. मुंबई महापालिकेत काही वर्षांपासून तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार सुरू आहे. कोलकात्यामधील २७ कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँडरिंग केले जात आहे. हे पैसे मुंबईकरांचे असून त्याची लूट करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी चौकशी व्हायला हवी, अशी मागणी साटम यांनी केली. महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांची सर्व कागदपत्रे आपल्याकडे आहेत. ही सर्व कंपन्यांची नावे, पत्ते आदी कागदपत्रे पुरावे असून आपण ते चौकशी यंत्रणांना देण्यासाठी विधिमंडळाच्या पटलावर ठेवले आहेत. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर मुंबईच्या लुटीची कहाणी उघडकीस येईल, असेही साटम यांनी सांगितले. गेल्या २५ वर्षांत मुंबई महापालिकेत झालेल्या तीन लाख कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला हवी, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना व्यक्त केले. आपल्याला कोणावरही आकसापोटी कारवाई करायची नाही; परंतु जे जबाबदार आहेत, त्यांची चौकशी व्हायला हवी, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com