ज्‍येष्ठ नागरिकांना रंग कौशल्याचा आधार

ज्‍येष्ठ नागरिकांना रंग कौशल्याचा आधार

मुलुंड, ता. २६ (बातमीदार) ः ज्‍येष्‍ठ नागरिकांना सध्याच्या काळात निवृत्तीनंतरचे आयुष्य म्हणजे नवे आव्हान आणि जीवनातील नव्या संघर्षाचा काळ असतो. जीवनाचा हा दुसरा डाव खेळताना त्यांना स्वयंपूर्ण आणि आत्मविश्वासाने जगता यावे, यासाठी समाजसेवक आणि अभिनेते रमेश मेश्राम हे सदैव प्रयत्नशील असतात. त्‍यांनी मुलुंडमधील ‘रंगकौशल्य कट्टा’च्या माध्यमातून अनेकांना आधार दिला आहे. आता त्यांनी ‘वरिष्ठ नागरिक मित्र मंडळ’ ग्रुप स्थापन करुन ज्येष्ठांना आधार देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्य, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक समस्यांसह कायदेशीर सल्लादेखील दिला जाणार आहे. या ग्रुपची सुरुवात १ एप्रिलला सायंकाळी ६.३० वाजता मुलुंड पूर्वेकडील खंडोबा मंदिर आणि आयटीआयजवळ असलेल्या ‘रंगकौशल्य कट्टा’ येथे करण्यात येणार आहे. या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक वरिष्ठ नागरिकांनी रमेश मेश्राम ९८१९२२११७७ आणि ज्योती कुलकर्णी ७७३८५५८५१६ यांच्या क्रमांकावर मेसेज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com