साहित्य चावडीवर वसंत बहार

साहित्य चावडीवर वसंत बहार

विरार, ता. २६ (बातमीदार) : वसंताच्‍या आगमनाने निसर्गाचे सौंदर्य खुलून येते. पक्ष्यांचा किलबिलाट, कोकिळेचं कुहू... कुहू गाणे, रंगीबेरंगी फुलांनी सजलेली झाडे असे सौंदर्य पाहून कवीला कविता न सुचली तरच नवल. याच आल्‍हाददायक वातावरणात कविसंमेलनालाही बहर येतो; अन् मग दर्दी रसिकांच्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादात स्‍तुतिसुमनांचा वर्षाव होतो. कविता म्‍हणजेच जगण बनलेल्‍या कवींच्‍या वासंतिक कविसंमेलनाचे शहरात आयोजन करण्‍यात आले होते. या वेळी वसंत ऋतूच्‍या आगमनाच्‍या विविध काव्‍यरचना सादर करण्‍यात आल्‍या. याला रसिक श्रोत्‍यांची दाद मिळाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्‍येष्ठ साहित्यिक आणि कोकण मराठी साहित्य परिषदचे पालघर जिल्हाध्यक्ष नंदन पाटील आणि चव्हाण काकू यांना आदरांजली वाहण्यात आली. यंगस्टार्सचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रेरणेने आणि अजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगलमूर्ती मंदिरात कविसंमेलनासचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा कुरकुरे यांनी केले. सोनेरी किरणांचा रथ घेऊन आला वसंत आला... मनी आनंद फुलला अशा अनेक निसर्ग कविता साहित्य चावडीवर बहरल्या; तर वसंत ऋतु आवत है हिंदी कविता सीमाने सादर करत रसिकांची वाहवा मिळवली. चैत्राच्या आधीची पानगळ याविषयी स्मरणा शेट्ये नी सुंदर रचना सादर केली. निसर्गाबरोबरच साहित्य आणि वाचन संस्कृती जोपासण्याचा संकल्प चावडीवर करण्यात आला
सुरेश घरत, किशोरी पाटील नवघरे, संजना, श्रुती , उज्ज्वला मुदप्पू, सुप्रिया, हरिश्चंद्र मीठबावकर अर्चना नयन जैन अशा तब्बल २५ कविंनी सहभाग नोंदविला. कविता म्हणजे जगणं. कविता ही स्फुरावी लागते, असे मत चावडी सरपंच प्रा. दीपाली ठाकूर यांनी मांडले. सुरेखा कुरकुरे यांनी सर्वाच स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय उमरजी यांनी केले. विक्रांत केसरकर यांनी सरपंच यांचा परिचय करून दिला आणि कवितांनी फुललेल्या वसंताचे आभार मधुकर तराळे यांनी मानले. विशेष सहकार्य दीपाली जाधव यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com