कोमसापमुळे मातृभाषेची गोडी वाढली : जयप्रकाश चौधरी

कोमसापमुळे मातृभाषेची गोडी वाढली : जयप्रकाश चौधरी

विरार, ता. २७ (बातमीदार) : वसई-विरारमध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेची शाखा स्थापन झाल्यानंतर अनेक नवोदित लेखक, कवी, विविध विषयांवर लिहिणारे जाणकार आपली पुस्तके प्रकाशित करणारे लेखक व प्रकाशक यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. यामुळे कोकण मराठी साहित्य परिषदेने खऱ्या अर्थाने मातृभाषेची गोडी वाढविली, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ शिक्षक जयप्रकाश चौधरी यांनी विरार येथे केले. ते कोकण मराठी साहित्य परिषद विरार शाखेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते.
विरार येथे कोमसाप शाखेने विठ्ठलनाथ संस्थान मंदिरात वर्धापनदिन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रा. दिनेश कांबळे, ज्येष्ठ शिक्षक जयप्रकाश चौधरी, विठ्ठलनाथ संस्थानचे अध्यक्ष प्रशांत सामंत उपस्थित होते. शासकीय, न्यायालयीन पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे देशातील बोर्ड आणि आंतराष्ट्रीय बोर्ड व सहकारी संस्था, गृहनिर्माण संस्था, पोलिस प्रशासन यांच्यामार्फतही संस्थात्मक पातळीवर कशाप्रकारे मराठीचे संवर्धने करतात त्याची प्रत्यक्ष उदाहरणे देऊन कांबळे यांनी आपल्या भाषणात माहिती दिली. त्याचप्रमाणे व्यक्तिगत पातळीवरही आपण ज्ञान आणि माहिती देऊन या संस्थांद्वारे मराठीचे महत्त्व कसे वाढवू शकतो, हे देखील त्यांनी सांगितले.
‘कोमसाप’च्या वाटचालीत शिक्षणबाह्य जगातदेखील मराठीच्या लेखनाची, साहित्याची तसेच वाचनाची गोडी निर्माण होण्यास मदत झाली. खऱ्या अर्थाने साहित्याची परिभाषा, मराठी भाषेचे मातृभाषा म्हणून जपत असलेले महत्त्व याचे आकलन होऊन इतर भाषांच्या तुलनेत मराठीतले ज्ञान व शिक्षणही प्रगतीसाठी आवश्यक आहे. आपल्या आत्मिक उन्नतीसाठी, मराठी भाषेत प्रस्थापित होण्यासाठी शाखांचे महत्त्व सक्रिय कार्यकर्त्यांना कळू लागले. त्यामुळे ‘कोमसाप’ शाखा-शाखांतून जनमानसांत पोहोचली. शैक्षणिक ज्ञानाचाही विस्तार होण्यास शिक्षक वर्गाला शाखांची मदत झाली, असे प्रतिपादन गीता ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रशांत सामंत व कोमसाप विरार शाखेचे अध्यक्ष उमाकांत वाघ यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com