विहिगाव वनविभाग कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा

विहिगाव वनविभाग कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा

खर्डी, ता. २७ (बातमीदार) : विहिगाव वनविभागांतर्गत कसारा बुद्रुक गावात निर्माण झालेल्या अतिक्रमित मुद्द्यावरून स्थानिक वनविभागाविरोधात ३१ मार्च रोजी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कसारास्थित कार्यालयावर धडकणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व सर्वपक्षीय अतिक्रमण बचाव कृती समितीचे अध्यक्ष देविदास भोईर करणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक यांसह संबंधित प्रशासनाला मोर्चाबाबत निवेदने देण्यात आली आहेत.
कसारा बुद्रुक गावातील पूर्व व पश्चिमेकडील भागात नव्याने झालेली अतिक्रमणे हटविण्यासाठी व बांधकामे रोखण्यासाठी विहिगाव वनविभागाने कारवाईचा बडगा उभारला आहे. त्याअनुषंगाने सहा महिन्यांपूर्वी अतिक्रमण धारकांना पूर्वकल्पना न देता घरे जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली होती. या प्रकारामुळे गावातील अतिक्रमित धारक हवालदिल झाले असून, त्यांचे संसार रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. येथील अतिक्रमणे हटू नयेत यासाठी सरपंच प्रकाश वीर यांनी सर्वपक्षीय अतिक्रमण बचाव कृती समितीची स्थापना केली. मोर्चावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसेना एकनाथ शिंदे, भाजप, राष्ट्रवादी पक्ष, सामाजिक संघटना आदी रस्त्यावर उतरणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com