खर्डीतील चायनीज विकणाऱ्या तरुणाची कौतुकास्पद कामगिरी

खर्डीतील चायनीज विकणाऱ्या तरुणाची कौतुकास्पद कामगिरी

खर्डी, ता. २७ (बातमीदार) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नोकरी गेलेल्या खर्डी येथील एका होतकरू तरुण कुमार चौधरी याने चायनीज विकण्याचा व्यवसाय करून आपली आवड जोपासत हरियाणा येथे झालेल्या वेटलिफ्टिंगच्या स्पर्धेत सिल्व्हर व ब्राँझ पदक मिळवून खर्डी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याची कॅनडा येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कुमार चौधरी या तरुणाला व्यायामाचे वेड असल्याने तो दिवसातून दोन वेळा खर्डी येथील व्यायमशाळेत जात होता. त्याची घरची परिस्थिती हालाखीची असून खर्डी येथे चायनीजचे हॉटेल चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. वेटलिफ्टिंगच्या अनेक व्हिडीओ यू-ट्युब पाहत त्याने त्यासाठी विशेष परिश्रम घेत गावपातळीवरील वेटलिफ्टिंग स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदक मिळवले होते. या स्पर्धेतील कुमार याच्या व्हिडीओला समाज माध्यामांवर लोकांची पसंती मिळाली. त्यानंतर त्याला उल्हासनगर येथील रतन्स हेल्थ क्लबचे मालक व प्रशिक्षक दीपक दीक्षित मिळाले. प्रशिक्षकांनी कुमारला हरियाणा येथील नॅशनलस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रवेश मिळवून दिला. भारतभरातून आलेल्या स्पर्धकांमधून आपली मेहनत दाखवत स्पर्धेत कुमारने ‘डेडलिफ्ट २२०’ किलो वजनी गटामध्ये सिल्वर मेडल, तसेच बेंचप्रेस १३० वजनी गटामध्ये ब्राँझ मेडल पटकावले. नॅशनल स्पर्धेत कुमारने दोन पदके मिळविल्याने त्याची कॅनडा येथील इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यावेळी कुमार चौधरी याने सांगितले की, ‘वेटलिफ्टिंगसाठी दीपक दीक्षित यांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन लाभल्याने व माझ्या कुटुंब, मित्रपरिवार यांनी यासाठी सतत प्रोत्साहन दिल्याने मला हे यश मिळाले असून मला भारताचे प्रतिनिधित्व करून गोल्ड मेडल मिळविण्याची इच्छा आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com