प्रकल्‍पासाठी घेतलेल्‍या जमीन १७ वर्षे पडीक

प्रकल्‍पासाठी घेतलेल्‍या जमीन १७ वर्षे पडीक

अलिबाग, ता. २७ ( बातमीदार) ः शेती व्यवसायासंबंधित प्रकल्प उभारणे, त्यातून रोजगार उपलब्‍ध करण्याचे प्रलोभन दाखवून अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी खासगी कंपन्यांनी संपादित केल्‍या, मात्र त्या ठिकाणी कोणताही प्रकल्प उभारला नसल्याने सुपीक जमीन नापिक झाल्‍याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आपल्‍याला न्याय मिळावा, यासाठी सोमवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
जवळपास दहा खासगी कंपन्यांनी दलालाच्या मदतीने १७ वर्षांपूर्वी मेढेखार, काचळी, पिटकरी, खातवीरा, कातळपाडा, हेमनगर, कुसूंबळे येथील ३७५ शेतकऱ्यांकडून ७५० एकर जमीन कवडीमोल भावाने विकत घेतली. मुलांना रोजगार मिळेल, शेतीसंबंधित व्यवसाय सुरू होतील, असे प्रलोभन यावेळी दाखवण्यात आले होते. परंतु आजतागायत विकलेल्या जमिनीवर एकही प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. अनेक वर्षांपासून ही जमीन पडीक आहे. त्याचा परिणाम समुद्र, खाडीतील खारे पाणी शिरल्‍याने पिकती जमीन नापिक झाली आहे. जवळपास ९० शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला न देता जमिनीचा ताबा घेण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांनी तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ही बाब लक्षात आणून दिली होती. त्‍यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्‍या होत्‍या. मात्र त्‍यानंतर याप्रकरणी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. स्‍थानिक लोकप्रतिनिधींनीही निराशा केल्‍याचे शेतकऱ्यांचे म्‍हणणे आहे. त्यामुळे समाज क्रांती आघाडी संचालित मेढेखार, काळवडखाडी, अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

रोजगाराची मागणी
प्रकल्पातून रोजगार मिळण्याचे आश्वासन देऊनही प्रकल्प उभारले नाही. त्यामुळे सुशिक्षित तरुणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. जमिनी अनेक वर्षे पडीक असल्‍याने नापिक झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. सध्याच्या किमतीत जमिनी खरेदी करून फरक द्यावा तसेच रोजगार द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com