विद्यार्थ्यांनी वाचन करावे ः चिरमुरे

विद्यार्थ्यांनी वाचन करावे ः चिरमुरे

अंबरनाथ, ता. २८ (बातमीदार ) ः विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणावे. भविष्यात शिक्षण खूप उपयोगी पडते. विद्यार्थ्यांनी वाचन करावे, असा सल्ला पुणे येथील स्टफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन चिरमुरे यांनी दिला. ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था आणि अंबरनाथ नगरपालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने टीचर इनोव्हेटर प्रोग्रॅमअंतर्गत सिखे इंडिया उत्सव जिल्ह्यात राबवला जात आहे. याअंतर्गत सोमवारी (ता. २७) अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळा क्रमांक ९ मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संचालक चिरमुरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेच्या मुख्याध्यपिका रत्नप्रभा जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बघावीत, पालक आणि गुरुजनांचा आदर करावा, कोणतेही काम करताना कमीपणा बाळगू नये, आम्ही शाळेला लागेल ते सहकार्य करू, अशी ग्वाही चिरमुरे यांनी दिली. रवींद्र नंबियार, सिखे संस्थेच्या अर्चना शिंदे, जिल्हा समन्वयक सुमित कांबळे, अश्विनी पाटील, उत्कर्ष पाटील, मनोहर कामरकर, नरेश सोनावणे, समाधान सोनुने आदी या वेळी उपस्थित होते. शाळेचे केंद्र समन्वयक शेषमल राठोड यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com