पटणी रस्त्याच्या बाजूला अनधिकृत नर्सरी

पटणी रस्त्याच्या बाजूला अनधिकृत नर्सरी

वाशी, ता. २७ (बातमीदार) : एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांखाली असणाऱ्या जागेवर मोक्याच्या ठिकाणी नर्सरी (रोपवाटिका) व्यवसाय अनधिकृत सुरू आहे. या नर्सरी या राजकीय नेत्यांच्या आर्शीवादाने साकारल्या आहेत. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अनेकांनी हा व्यवसाय थाटला आहे. अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
ऐरोलीतील पटनी रस्त्याच्या मार्गावरील या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मोकळ्या भूखंडावर नर्सरी बिनदिक्कतपणे सुरू आहेत. या नर्सरी व्यावसायिकांकडून एमआयडीसी किंवा महापालिकेच्या तिजोरीत एकही दमडी न भरता व्यवसाय सुरू आहेत. इतकेच नव्हे तर अनेकांना विद्युत पुरवठाही करण्यात आल्याची माहिती उजेडात आली आहे. मात्र या नर्सरीकडे पालिकेचे किंवा एमआयडीसीकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे निर्दशनास येत आहे. या नर्सरीमध्ये आकर्षक फुला-फळांची झाडे, कलमे अशी १०० ते २०० जातींची रोपे विक्रीसाठी आहेत.

एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण केले असल्यास त्या नर्सरी हटवण्यात येतील.
- आर. जी. राठोड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com