उल्हासनगरात दुचाकी चोर अटकेत

उल्हासनगरात दुचाकी चोर अटकेत

उल्हासनगर, ता. २७ (वार्ताहर) : विठ्ठलवाडी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे उल्हासनगरातील एका सराईत चोराच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून तीन रिक्षा चोरीचा व एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे. काही महिन्यांपासून मोटरसायकल आणि रिक्षा चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पोलिस उप आयुक्त डॉ. सुधाकर पाठारे आणि सहायक पोलिस उपायुक्त मोतीचंद राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. त्यामुळे विठ्ठलवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले.
सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या आरोपीची ओळख पटल्यावर विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या डिटेक्शन टीमने शरद घुले उर्फ काल्या या चोराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन रिक्षा आणि मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक रिक्षा चोरी केल्याचे कबूल केले. जानेवारी महिन्यात १५ हजार रुपयांची घरफोडी झाली होती. ती घरफोडी शरद याने केल्याचेही कबूल केले आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर रिक्षाचालकांना त्यांच्या रिक्षा परत मिळतील, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com