प्रीती मेनन यांच्याविरोधात ‘ॲट्रॉसिटी’ दाखल

प्रीती मेनन यांच्याविरोधात ‘ॲट्रॉसिटी’ दाखल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २७ : आम आदमी पक्षाच्या (आप) मुंबई अध्यक्ष प्रीती मेनन-शर्मा आणि मनू पिल्लाई यांच्यासह २०-२५ कार्यकत्यांविरोधात अंधेरी पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘आप’ मुंबईत वाढवण्यासाठी राबणाऱ्या मराठी कार्यकर्त्यांना कुठल्याही निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही. उलट त्यांना अपमानित करून जातिवाचक शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप करत पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष रमेश भुतेकर-देशमुख यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांना तात्काळ अटक न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

भुतेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे, की आम्हाला कुठलीही पूर्वनोटीस न देता आपच्या मुंबईतील चकाला कार्यालयात बोलावण्यात आले. आम्ही तिथे गेलो असता तिथे २५-३० जणांचा जमाव होता. प्रीती मेनन-शर्मा यांच्यासह काही जणांनी कार्यालयाचे दरवाजे बंद करून शिविगाळ आणि धक्काबुक्की केली. या वेळी आपचे मुंबई प्रवक्ते ॲड. राकेश राठोड आणि डॉ. संजय कांबळे-बापेरकरही उपस्थित होते. बापरेकर यांनी प्रीती शर्मा मेनन यांना घडलेला प्रकार सांगितला असता मेनन यांनी जातिवाचक शिविगाळ केल्याचा आरोप बापेरकर यांनी केला आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक (अॅट्रॉसिटी) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून मराठी नेत्यांचे निलंबन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतिदिनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला नाही, त्यामुळे आम्ही व्यथित झालो आहोत. पक्षाची ध्येयधोरणे चांगली आहेत; मात्र मुंबई, महाराष्ट्रात अमराठी नेते पक्षाचे नुकसान करीत आहेत, पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत.
- रमेश भुतेकर-देशमुख, आप, मुंबई उपाध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com