शहापुरातील वाहतुक कोंडीने नागरिक हैराण

शहापुरातील वाहतुक कोंडीने नागरिक हैराण

शहापूर, ता. २८ (बातमीदार) : शहापूर शहरातील वाहतूक कोंडीमुळे वयोवृध्द नागरिक, महिला, विद्यार्थी, रुग्णवाहिका व रुग्ण यांना नाहक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शहापूर शहरात कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेली अनेक वर्षे हा प्रश्न सुटत नसल्याने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली आहे.
वाहतूक कोंडी होण्यासाठी कारणीभूत ठरत असलेल्या प्रमुख कारणांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी रस्त्याच्या मध्ये उभ्‍या राहणाऱ्या मोटरसायकलसह, लहान-मोठी वाहने असल्याने या वाहनांवर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मनसेचे शहापूर शहर उपाध्यक्ष सचिन खिसमतराव आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी वाढत्या वाहतूक कोंडीबाबत तहसीलदार, पोलिस निरीक्षक आणि शहापूर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देऊन वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सध्या शहापूर बाजारपेठेतून मार्गक्रमण करताना वाहनांना अर्धा किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी एक तास लागतो. शहरातील वाहतुकीची अवस्था दयनीय आणि केविलवाणी आहे. याबाबत संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या अनेक वेळा बैठका झाल्या; परंतु नागरिकांना डोकेदुखी ठरलेल्या या वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण होत नसल्याने आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे. हा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन देताना मनसे तालुका सचिव हॅरी खंडवी, मनसे सहकार सेना सचिव कौस्तुभ लिमये, शहापूर उपाध्यक्ष किशोर गारुडकर, दीपक भांगरे, मयूर काबाडी आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com