प्राध्यापकांना नियमबाह्य विद्यापीठाची घरे

प्राध्यापकांना नियमबाह्य विद्यापीठाची घरे

घाटकोपर, ता. २८ (बातमीदार) ः मुंबई विद्यापीठातील अनेक प्राध्यापकांनी स्वतःची घरे भाड्याने देऊन विद्यापीठातील घरे नियमबाह्य पद्धतीने मिळवली आहेत, असा आरोप करत याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी विद्यापीठाचे कुलगुरू तसेच प्र–कुलगुरू यांच्याकडे ईमेलद्वारे पत्र पाठवले आहे.
मातेले यांनी पाठवलेल्‍या पत्रात मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या आयडॉल विभागातील प्राध्यापकांनी नियमांना बगल देऊन विद्यापीठ परिसरातील सेवा सदनिका प्राप्त करून घेतल्या असल्‍याचा आरोप केला आहे. तसेच विहित शैक्षणिक पात्रता नसतानाही काही प्राध्यापकांनी तासिका तत्त्वावर स्वतःच्या पत्नीची नेमणूक करवून घेतली असल्‍याचेही म्‍हटले आहे. यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरला आहे, असा आरोप मातेले यांनी केला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या संगनमताने हे ‘नवीन आयडॉल’ तयार झाले आहेत असा सांगत या प्रकरणी संबंधितांनी या गैरकारभाराची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मातेले यांनी पत्राद्वारे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com