रायगड जिल्ह्यात कोरोनाचे १४ रुग्ण

रायगड जिल्ह्यात कोरोनाचे १४ रुग्ण

अलिबाग, ता. २८ : रायगडमध्येही पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात १४ रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे यांनी दिली. रुग्णसंख्या वाढू नये यासाठी आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
येथील तुरुंगात दोन आरोपी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर प्रधान आरोग्य सचिव डॉ. नवीन सोना यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत अधिकारीवर्गाला योग्य त्या सूचना केल्या. गेल्या आठवड्यात रायगडात आठ रुग्ण सापडले आहेत. संख्या वाढताना दिसत आहे. सध्या या सर्वांना होम आयसोलेशनमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. रायगडात पनवेल शहर आणि ग्रामीण भागात हे सर्वाधिक रुग्ण असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात बहुधा मास्कसक्ती पुन्हा सुरू केली जाण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. जिल्ह्यात तिसरा बूस्टर डोस सुरू करण्याबाबत सरकारकडे मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com