दक्षिणेतील आंब्याला ग्राहकांची पसंती

दक्षिणेतील आंब्याला ग्राहकांची पसंती

वाशी, ता. २९ (बातमीदार)ः वाशीच्या घाऊक फळ बाजारात सध्या कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे बाजारात हापूसचा सुगंध दरवळत आहे. त्याचबरोबर दक्षिण भारतातून वेगवेगळ्या जातीचे आंबेदेखील बाजारात येऊ लागले असून महागड्या हापूसला पर्याय विविध जातींच्या दक्षिणेकडील आंब्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.
घाऊक बाजारात सध्या दररोज ६० हजार आंब्यांच्या पेट्यांची आवक होत आहे. त्यात ४५ हजार पेट्या कोकणातील हापूस आंब्याच्या आहेत, तर १५ हजार पेट्या दक्षिणेकडील आंब्याच्या आहेत. शिवाय, खुल्या स्वरूपातही हा दाक्षिणात्य आंबा मोठ्या प्रमाणात दिसत आहे. या आंब्याच्या ३० ते ४० गाड्या सध्या बाजारात दररोज दाखल होत आहेत. शिवाय या आंब्यांचे दर कोकणातील हापूसच्या तुलनेत कमी असल्याने सर्वसामान्य वर्गाकडून या आंब्याला मागणी असते. दक्षिणेतील हापूसपाठोपाठ बदामी आंब्यालाही विशेष मागणी आहे. जास्त करून फळांचा रस करण्यासाठी, हॉटेल व्यावसायिक आणि सर्वसामान्यांकडून या आंब्याला विशेष मागणी असते. हापूसचे दर सर्वांनाच परवडत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांची दक्षिणेच्या बदामी आंब्याला विशेष पसंती आहे.
------------------------------------
किलोनुसार विक्री
सध्या हुबळी, कारवार, बेंगळुरू आणि केरळमधून हे आंबे बाजारात येत आहे. यात दक्षिणेचा हापूस आंबाही आहे. हा हापूस कोकणच्या हापूस आंब्याच्या मानाने चवीला आणि सुगंधाला थोडा कमीच असतो. हा आंबा डझनावर नाही, तर किलोवर विकला जातो; तर काही व्यापारी हा कर्नाटक हापूस या नावाने विकतात.
------------------------------------------
कोकणच्या हापूसची सर नाही
दक्षिणेचा हापूस आंबा म्हणजे कोकणच्याच आंब्याची रोपे तिकडे नेऊन लागवड करून उगवलेली झाले आहेत. मात्र, कोकणच्या लाल मातीचा आणि जांभ्या खडकाचा गुणधर्म त्यात उतरत नाही. त्यामुळे हे फळ दिसायला कोकणातील फळासारखेच असले, तरी चवीला मात्र कोकणच्या हापूसची सर नसते.
--------------------------------------------
आंब्याचे दर (प्रतिकिलो)
बदामी ः १२० ते १४० रु.
लालबाग ः ५० ते ८० रु.
तोतापुरी ः ४० ते ७० रु.
कर्नाटक आंबे ः ८० ते १४० रु.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com