अभय योजनेतून ६९ हजार जणांचा करभरणा

अभय योजनेतून ६९ हजार जणांचा करभरणा

वसई, ता. २९ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेने यंदा विक्रमी मालमत्ता करवसुली केली आहे. या करापोटी तिजोरीत मार्च महिन्याच्या अखेरीस एकूण ३५० कोटी रुपये जमा झाले आहेत. यात अभय योजनेतून थकबाकीदारांसह नागरिकांनी एकूण ४६ कोटी ६६ लाख रुपये भरले आहेत.
वसई-विरार शहर महापालिका हद्दीत नऊ लाख २७ हजार मालमत्ताधारक आहेत. पूर्वी मालमत्ता करवसुली करताना थकबाकीधारकांची डोकेदुखी निर्माण होत होती. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत होता. महापालिकेचे आर्थिक स्रोत म्हणून या कराकडे पाहिले जाते; परंतु औद्योगिक वसाहत, रहिवासी व व्यापारी वर्गातील अनेक करदाते कर भरणा करण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यामुळे महापालिकेने पाच वर्ष कर भरणाऱ्यांना सूट यासह अन्य योजना आणल्या. तसेच घरोघरी जाऊनदेखील करवसुलीवर भर दिला. तसेच अभय योजनेची माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी, यासाठी समाजमाध्यम, माहितीपत्रक अशा माध्यमातून जनजागृती केली. आयुक्त अनिलकुमार पवार व उपायुक्त समीर भूमकर यांनी मालमत्ता करवसुलीचा रोजचा आढावा पथकाकडून घेतला व त्यानुसार थकबाकीधारक कोणत्या प्रभागात अधिक आहेत, याची यादी तयार करून पाठपुरावा घेण्यासदेखील सुरुवात केली. याचा चांगला परिणाम यंदा दिसून येत आहे.
मालमत्ता कर विभागाने मार्च महिन्याच्या सुरुवातीला ११ तारखेपर्यंत पंधरा दिवसांत ३२२ कोटी ५० लाखांचा टप्पा पूर्ण केला होता, तर पंधरा दिवसांत यात २८ कोटी ५० लाखांची भर पडली आहे. अभय योजनेमुळे मालमत्ताधारक करभरणा करण्यासाठी पुढे आल्याने वसुलीला प्रतिसाद मिळाला आहे.
-------
यंदा मालमत्ता करवसुली ४०० कोटींहून अधिक होईल, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. अभय योजनेलादेखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ज्या मालमत्ताधारकांनी कर भरला नाही, त्यांनी लवकरात लवकर पैसे जमा करून महापालिकेला सहकार्य करावे.
- समीर भूमकर, उपायुक्त, मालमत्ता कर संकलन विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com