तवा शाळेत विद्यार्थिनींना सायकल वाटप

तवा शाळेत विद्यार्थिनींना सायकल वाटप

कासा, ता. ३० (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील तवा येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींना मानव विकास योजनेअंतर्गत नुकतेच सायकल वाटप करण्यात आले. तवा जिल्हा परिषद शाळेत तवा, बऱ्हाणपूर आदी भागातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. शासनाच्या मानव विकास या योजनेअंतर्गत गरीब व गरजू मुलींना मोफत सायकल दिल्या जातात. या योजनेतून तवा जिल्हा परिषद शाळेतून आठवीच्या १६ विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. यामुळे लांबून येणाऱ्या मुलींना खूप फायदा होईल. या कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य शैलेश हाडळ यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी तवाचे सरपंच लहू बालशी यांनी उपस्थित राहून गावातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. कोल्हाण केंद्राचे केंद्रप्रमुख नंदकुमार लिलका यांनीही शुभेच्छापर मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com