कळव्यात रामजन्मोत्सव उत्साहात

कळव्यात रामजन्मोत्सव उत्साहात

कळवा, ता. ३० (बातमीदार) : कळव्यात रामनवमीच्‍या निमित्ताने रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विश्वहिंदू परिषद व भाजपचे विधी सेल ठाणे शहर उपाध्यक्ष ॲड. सुदर्शन साळवी यांच्या सौजन्याने गावदेवी कळवण देवी रस्त्यावरील निवारा कार्यालयाजवळ गुरुवारी सकाळी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेसमोर होमहवन, जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेऊन रामजन्मावर पाळणा हलवित गाण्यांचा ठेका धरला. प्रसाद वाटप करण्यात आले. तर कळवा गावदेवी मैदान ते कळवा बाजार जुना बेलापूर रस्ता, मनीषानगर कळवा परिसरात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत कळवा परिसरातील नागरिक, दुकानदार, विविध पक्षांचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
------------------------------------
मुरबाड परिसरात भक्‍तिमय वातावरण
मुरबाड, ता. ३० (बातमीदार) : मुरबाड शहर परिसरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. ब्राह्‍मणगाव येथे बुधवारी सायंकाळी हरिपाठ व त्यानंतर सुभाष महाराज तरणे यांचे कीर्तन झाले. गुरुवारी सकाळी प्रभू रामचंद्राला अभिषेक, भारती कुमावत यांचे प्रवचन व गणेश महाराज पुळकुंठवर यांचे कीर्तन झाले. दुपारी रामजन्म महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विविध मान्यवरांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुरबाड शहरातील पुरातन राम मंदिरामध्ये कीर्तन आयोजित करण्यात आले होते. साईबाबा मंदिर माता नगर येथे सकाळी सामुदायिक अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली.
-------------------------------
किन्हवलीत रामनामाचा गजर
किन्हवली, ता. ३०(बातमीदार) : किन्हवली आणि परिसरात रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. किन्हवली येथील प्रभुआळीतील श्रीराम मंदिरात दरवर्षीप्रमाणे विधीवत पूजा अर्चा, राम जन्मकथा पारायण ठेवण्यात आले होते. या मंदिराचे पौरोहित्य करणारे रामकाका रत्नाकर यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाल्याने त्यांच्‍या कुटुंबीयांनी परंपरा खंडित न करता रामनवमी उत्सव साजरा केला. फोफोडी येथे वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाच्या प्रवक्त्या करुणा गगे यांचे प्रवचन आयोजीत केले होते. आपटे-श्रीरामनगर येथे रामजन्मोत्सवानिमित्त रामेश्वर मंदिराला फुलापानांची आकर्षक सजावट केली होती. येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रामजन्माच्या पाळणा कार्यक्रमात गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com