रामनवमीनिमित्त दिव्यात शोभायात्रा, बाईक रॅली

रामनवमीनिमित्त दिव्यात शोभायात्रा, बाईक रॅली

दिवा, ता. २ (बातमीदार) : रामनवमीनिमित्त दिव्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर मुंब्रा देवी कॉलनीमध्ये महाआरती करण्यात आली. या रॅलीत भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांची प्रमुख उपस्थिती होती. समाजसेवक अमोल केंद्रे यांच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली. मुंब्रा देवी परिसरातील भाविक, नागरिक मोठ्या प्रमाणात या महाआरतीत सहभागी झाले होते. महाआरतीनंतर रथातून हनुमान, श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचे आगमन झाल्यानंतर भाविकांनी मोठ्या जल्लोषात जय श्री रामाचा जयघोष केला. दिवा शहर भाजपचे मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे, महिला अध्यक्षा ज्योती पाटील, ठाणे शहर कार्यकारिणी सदस्य अशोक पाटील, विजय भोईर, ठाणे शहर उपाध्यक्ष नरेश पवार, ठाणे शहर ओबीसी सेल उपाध्यक्ष विनोद भगत यांच्या संकल्पनेतून ही पदयात्रा आयोजित करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com