राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राची चमकदार कामगिरी

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राची चमकदार कामगिरी

मुंबई, ता. ३ : कटक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राने एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने ही स्पर्धा झाली. पालघरच्या स्वरा नितोरे हिने ३५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. संचिता घाणेकर हिने २६ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले. अहमदनगरच्या वैष्णवी बेरड हिने २० किलो गटात; तर पुण्याच्या शेजल श्रीमलने ४७ किलो गटात कांस्यपदक पटकावले. वैयक्तिक गटात अर्णव जगताप यानेही महाराष्ट्राला रौप्यपदक मिळवून दिले. संघ व्यवस्थापक अजित घारगे, प्रशिक्षक प्रशांत कांबळे, दिनेशसिंह राजपूत व रॉबिन वॉल्टर मेनेझिस यांचे मार्गदर्शन खेळाडूंना मिळाले. या कामगिरीबद्दल खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com