विद्यार्थ्यांनी भरवला कॅम्पस बाजार

विद्यार्थ्यांनी भरवला कॅम्पस बाजार

उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) ः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे मिळण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचा कॅम्पस बाजार आयोजित करण्यात आला होता. उल्हासनगरातील एसएसटी कॉलेजने यासाठी पुढाकार घेतला. या बाजाराला चांगलाच प्रतिसाद मिळाला. सर्व वस्तूंची विक्री झाल्याने विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला.

कॉलेजचे संस्थापक-अध्यक्ष प्राचार्य डॉ. पुरस्वानी यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या वस्तू तयार करण्यासाठी प्रेरित केले. विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा हा यामागील हेतू होता. त्यानुसार विद्यार्थ्यांनी गुलदस्ता, मोजे, कपडे, धूप, जेवणाचे पदार्थ, वडापाव, सँडविच, नव्या पद्धतीचे सरबत तयार केले होते. या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी कॉलेजच्या हॉलमध्ये स्टॉल लावण्यात आले. या सर्व वस्तू विकल्या गेल्यावर व त्याचा नफा मिळाल्यावर विद्यार्थी सुखावून गेले. आम्हाला आम्ही तयार केलेल्या वस्तूंचे मार्केटिंग करण्याचे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त झाले. या कॅम्पस बाजारमुळे आमचा आत्मविश्वासही वाढला, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. हा कॅम्पस बाजार यशस्वी करण्यासाठी प्रा. नम्रता सिंग आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com