कल्याणमध्ये रविवारी आमदार चषक बुद्धिबळ स्पर्धा

कल्याणमध्ये रविवारी आमदार चषक बुद्धिबळ स्पर्धा

कल्याण, ता. १३ (बातमीदार) : कल्याणमध्ये पहिली आमदार चषक बुद्धिबळ स्पर्धा रविवारी (ता. १६) होणार आहे. या स्पर्धेत देशातील १७ राज्यांतील ६०० ते ७०० खेळाडू सहभागी होणार असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण तालुका बौद्धिक संस्थेच्या माध्यमातून अखिल भारतीय खुल्या जलद मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती देण्यासाठी आज (ता. १३) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी संजय पाटील, मोहन उगले, सुनील खारूक, जयवंत भोईर, प्रभुनाथ भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. कल्याणमधील एपीएमसी मार्केट येथील नवरंग बँक्वेट हॉलमध्ये रविवारी स्पर्धेला सुरुवात होईल आणि नऊ फेऱ्यांनंतर विजेत्याची घोषणा केली जाईल. प्रथम पारितोषिक दुचाकी आणि दोन लाख रुपये रोख देण्यात येणार आहेत. याशिवाय ९७ ट्रॉफी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत प्रामुख्याने तमिळनाडूचे आर. आर. लक्ष्मण सहभागी होणार असून कल्याणच्या खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा, या दृष्टिकोनातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com