उन्हाळ्यामध्ये सकस आहाराचा कानमंत्र

उन्हाळ्यामध्ये सकस आहाराचा कानमंत्र

जुईनगर, बातमीदार
उन्हाळा म्हंटल की अंगाची लिहिलाही होते. अशा काळात मसाले दार, चटपटीत पदार्थांएेवजी शरीराला गारवा देणारे पदार्थ खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. उन्हाळ्यामध्ये शरीराला सकस आहार घेणे आवश्यक असते. मात्र, अनेकांना उन्हाळ्यात काय आणि कोणत्या पदार्थाचे सेवन करावे हेच समजत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात शारीरिक श्रमांसोबत तिखट पदार्थांचे सेवन टाळणे गरचेचे आहे.
-------------------------------------------
काय काळजी घ्याल.
-उन्हाळ्यात शरीरातील मिठाचे आणि पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यासाठी खूप पाणी प्यायला पाहिजे.
-शरीरात थंडावा निर्माण व्हावा यासाठी फळं आणि भाज्यांचे रस, सरबत आणि द्रव पदार्थांचे खूप सेवन केलं पाहिजे. मात्र, हे घेताना यात साखर सेवन करू नये. साखरेमुळे शरीरातील आम्लधर्मी गुणधर्म वाढून चयापचय क्रियेवर त्याचा परिणाम होतो.
-खनिजक्षार आणि जीवनसत्त्व हे देखील खूप गरजेचे असतात. म्हणून शहाळ्याचे पाणी, लिंबू पाणी, ताक, दही, कैरीचे पन्हे याचे सेवन करावे तसेच काकडी, कांदा, कोथिंबीर, पुदिना, कलिंगड अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा.
-या काळात पचायला हलका असा आहार घ्यावा. ज्वारी, नाचणी, मूग अशा थंड गुणधर्माची धान्य जरूर खावीत. याचबरोबर गायीचे दूध, वरणभात, खिचडी अशा पदार्थांचे सेवन करावे.
- उन्हाळ्यामध्ये पचन क्रिया मंदावलेली असते, तेव्हा जास्त तळलेले पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, बेकरीतील उत्पादनं, जंक फूड, कार्बोनेट ड्रिंक्स यांचे सेवन वर्ज्य करावे. तसेच चहा, कॉफी, अल्कोहोल अशा उष्णता वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करू नये.
- उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे अन्न लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच शक्यतो ताजे पदार्थच खावेत. शिळे अन्न खाणे टाळावे. शिळे अन्न खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकते.
- रात्रीचा आहार हा अत्यंत हलका असावा. मांसाहारी पदार्थ शक्यतो सकाळ किंवा दुपारच्या वेळेतच सेवन करावेत. तसेच रात्रीचा आहार झोपण्यापूर्वी तीन तास आधी घेणे आवश्यक आहे.
----------------------------------------------
उन्हाळ्यात पाचक अग्नी फार मंद असतो. सकाळी जड व अजीर्णकारक पदार्थ मुळीच खाऊ नये. हलके, फुलके शरीर थंड राहील असे पदार्थ प्रमाणात खावे. या काळात मांसाहार आणि धूम्रपान शक्यतो करून टाळावा.
-डॉ. सुभाष मावळे, आहारतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com