शिवसेनेच्या वतीने कल्याणमध्ये सफाई

शिवसेनेच्या वतीने कल्याणमध्ये सफाई

कल्याण, ता. १६ (बातमीदार) ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कल्याण पूर्वमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानाची सुरुवात काटेमानिवली नाका येथून करण्यात आली. शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आले.

या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ काटेमानिवली नाका येथून करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत हनुमाननगर मुख्य रस्ता ते कैलासनगर चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंची साफसफाई करण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत महिला आघाडीच्या महिला शहर संघटक मीना माळवे, युवा सेना जिल्हा समन्वयक संतोष सावंत, युवा सेना शहर अधिकारी ॲड. नीरज कुमार, उपशहर अधिकारी अशोक पाखरे, उपशहर संघटक साधना पार्टे, सविता बळे, उपशहर प्रमुख हेमंत चौधरी, प्रकाश जाधव, उपशहर संघटक रवींद्र उत्तेकर, विभागप्रमुख संजय गुजर, उपविभागप्रमुख भिकाजी मोरे, अशोक पडांगळे, प्रसाद अडूरकर, महिला उपविभाग संघटक आश्लेषा पवार, योगिता गुजर, शाखाप्रमुख दत्ताराम नार्वेकर, शशिकांत गायकर, प्रतीक राय, महिला शाखा संघटक अमृता कदम, कल्याण पूर्व आयटी सेलप्रमुख पंकज पांडेय, कमलेश पार्टे, मीनाक्षी आहेर यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी, युवा सैनिक, महिला आघाडी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वच्छता अभियान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी योग्य त्या समन्वयाकरिता कल्याण-डोंबिवली महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली होती. या मोहिमेअंतर्गत रस्ते सफाई, परिसर सफाई, रस्त्यालगत असलेले डेब्रिज इत्यादी साहित्य उचलणे आदी गोष्टी करण्यात आल्या. याकरिता महापालिकेकडून वाहन उपलब्ध करून देण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com