अदाणी फाऊंडेशन आणि एनआयएआय यांच्यात सामंजस्य करार

अदाणी फाऊंडेशन आणि एनआयएआय यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, ता. १७ : अदाणी फाऊंडेशनने सिंगापूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्‍युकेशन इंटरनॅशनल (एनआयएआय) संस्थेशी सायन्स, टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथ्स (एसटीईएम) लीडरशिप कार्यक्रम राबवण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
सिंगापूरच्या टेमसेक फाऊंडेशनकडून हा कार्यक्रम चालवला जातो. या कार्यक्रमांतर्गत अदाणी फाऊंडेशनद्वारे संचालित ४२ शिक्षकांना एनआयएआयच्या विशेषज्ज्ञांकडून मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षित करण्यात येईल. या प्रशिक्षणादरम्यान गुजरात राज्यातील एसटीईएम अभ्यासक्रमांचे आणि यावर आधारित असलेल्या उद्योगांचे सर्वेक्षण केले जाईल. एसटीईएम अभ्यासक्रमाचा प्राथमिक आराखडा तयार करणे, एसटीईएम अभ्यासक्रम शिकवणारे नेतृत्व तयार करणे आदी बाबींचा यात समावेश असेल.
पाचव्या टप्प्यात प्रशिक्षणार्थी सिंगापूरच्या शाळा व महाविद्यालयांना भेटी देतील आणि सिंगापूरमध्ये एसटीईएम अभ्यासक्रम कसे शिकवले जातात याचे निरीक्षण करतील. तसेच हा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शिक्षकांशी संवाद साधून प्रत्यक्षात या क्षेत्रातील कौशल्ये आत्मसात करतील. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट हे भारत व सिंगापूर या देशात एसटीईएम प्रशिक्षकांचे मजबूत जाळे विणणे आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शी संलग्न असलेले भारतीय परिपेक्ष ध्यानात ठेवून निर्माण केलेले एसटीईएम अभ्यासक्रम धोरण आखण्यात होईल. या धोरणात मानके, मूल्यांकन करण्यासाठी लागणारी उपकरणे, हे धोरण कसे राबवावे यासाठीच्या शिफारशी आणि विविध उपक्रम यांचा समावेश असेल. हे सर्वसमावेशक धोरण विविध बोर्डांच्या शाळांत कसे राबवावे यासंदर्भातील अहवाल सादर केला जाईल, असे या वेळी सांगितले गेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com