देशी बनावटीच्या अग्निशस्त्रासह एकाला अटक

देशी बनावटीच्या अग्निशस्त्रासह एकाला अटक

नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : उत्तर प्रदेश येथून महापे येथे देशी बनावटीचे अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने अटक केली आहे. कुलदीपसिंग ठाकूर (२६) असे या तरुणाचे नाव असून तीन काडतुसेही जप्त केली आहेत.
महापे एमआयडीसीकडून शिळफाट्याकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाजवळ एक व्यक्ती देशी बनावटीचा कट्टा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस उप-निरीक्षक प्रताप देसाई व त्यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी सहाच्या सुमारास महापे एमआयडीसीकडून शिळफाटाकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाजवळ सापळा लावला होता. यावेळी संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या कुलदीपसिंगला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्याच्या बॅगमध्ये देशी बनावटीचा कट्टा व तीन जिवंत काडतुसे आढळून आली. त्यामुळे गुन्हे शाखेने कुलदीपसिंगविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
-------------------------------------
शस्त्रात्रे घेणाऱ्याचा तपास सुरू
कुलदीपसिंग याच्याकडे प्रयागराज (इलाहाबाद) ते कल्याणदरम्यानचे रेल्वेचे तिकीट सापडले आहे. त्यामुळे प्रयागराज येथून नवी मुंबईत आलेला कुलदीपसिंग कोणाला ही शस्त्रात्रे विकणार होता, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com