आधारकार्ड अद्ययावतकरणासाठी ‘कॅन्टरव्हॅन’

आधारकार्ड अद्ययावतकरणासाठी ‘कॅन्टरव्हॅन’

पालघर, ता. १८ (बातमीदार) ः आधार कार्डधारकांसाठी दस्तऐवज अद्ययावत करण्याच्या ‘कॅन्टरव्हॅन’ मोहिमेला जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. आधारकार्ड दस्तऐवज अद्ययावत करण्यासाठी प्रचार करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
कॅन्टरव्हॅन मोहीम हा एक मोबाईल उपक्रम आहे, जो जिल्ह्यातील दुर्गम भागात आणि गावांपर्यंत पोहचून नागरिकांना त्यांच्या दारात आधारकार्डविषयी अत्यावश्यक सेवा पुरवल्या जाणार आहेत. आधार कार्ड हे एक अत्यावश्यक दस्तऐवज आहे, जे विविध शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. आधार कार्डावरील माहिती अचूक आणि अद्ययावत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. कॅन्टरव्हॅन मोहीम हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. नागरिकांना आधार केंद्रांवर न जाता त्यांची आधार कार्ड माहिती अपडेट करण्याची संधी या मोहिमेद्वारे मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले. या वेळी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी संजीव जाधवर, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक ऊर्जित बर्वे, जिल्हा समन्वयक स्वप्नील चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

-------------------------
३० दिवस चालणार मोहीम
‘कॅन्टरव्हॅन’ ही मोहीम पुढील ३० दिवस चालणार असून, नागरिकांना कॅन्टरव्हॅनद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले. या मोहिमेमध्ये आधार नोंदणी करण्यासाठी अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असलेल्या मोबाईल व्हॅनचा समावेश असेल. आधारकार्डविषयी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी ही व्हॅन फिरणार आहे. कॅंटरव्हॅन मोहीम हा आधार कार्डाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या मोहिमेचा जिल्ह्यातील हजारो नागरिकांना फायदा होईल आणि त्यांना त्यांची आधारकार्ड माहिती सोयीस्करपणे अपडेट करता येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com