पदपथांवर रिक्षाचालकांची घुसखोरी

पदपथांवर रिक्षाचालकांची घुसखोरी

नेरूळ, ता. २० (बातमीदार)ः प्रवाशांसोबत रिक्षाचालकांच्या अरेरावीचे अनेक प्रकार नवी मुंबई शहरात घडले आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी वाहतूक विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. तरीही रिक्षाचालकांची अरेरावी सुरूच असून नेरूळ रेल्वेस्थानकातील पदपथांवरच घुसखोरी केल्याने प्रवाशांना मनस्ताप होत आहे.
तुर्भे, ऐरोली, वाशी, नेरूळ, सानपाडा, सीवूड्स, बेलापूर, कोपरखैरणे या विभागांतर्गत असणाऱ्या मार्गावर वर्षभरात मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या दुतर्फा, तसेच सोसायटीच्या प्रवेशद्वारावर आणि चौकाचौकांत रिक्षा थांबे उभारले गेले आहेत. विशेषतः नेरूळ रेल्वेस्थानक परिसरातील पदपथांवर अधिक प्रमाणात ही समस्या भेडसावत आहे. एकीकडे रिक्षाचालकांकडून जादा पैशांच्या प्रलोभनातून प्रवाशांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू आहेत; तर दुसरीकडे वाढत्या रिक्षांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. नेरूळ रेल्वेस्थानकाकडून बाहेर पडल्यानंतर सन्मान हॉटेलच्या दिशेने जाणाऱ्या पदपथावरच रिक्षाचालकांनी घुसखोरी केली असल्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरूच चालावे लागत आहे. त्यामुळे वर्दळीच्या वेळी नेरूळ रेल्वेस्थानकात कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत.
---------------------------------
नेरूळ स्थानकापासून सीवूड्स विभागात जाण्याकरिता रिक्षाचालक मीटरऐवजी तोंडी भाडे आकारतात. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अशातच आता पदपथावर रिक्षा उभ्या केल्यामुळे प्रवाशांना चालण्यास अडथळा होत आहे.
-किशोर जोशी, नागरिक
-------------------------------------
नेरूळ पूर्वेला चौकातच फेरीवाले बसलेले असतात. रिक्षा थांबल्यावर मोठी अडचण होते. येथील फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई केली पाहिजे. पदपथाचा वापर होत नसल्याने रिक्षाचालक रिक्षा उभ्या करतात.
- दिलीप आमले, अध्यक्ष, शिव वाहतूक सेना, नवी मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com