मनोर परिसरात रमजान ईदचा उत्साह

मनोर परिसरात रमजान ईदचा उत्साह

मनोर, ता. २२ (बातमीदार) : मनोर परिसरातील मुस्लिम वस्त्यांमध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना शुक्रवारी पूर्ण झाला. शुक्रवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने शनिवारी (ता. २२) रमजान ईद (ईद-उल-फित्र) साजरी करण्यात आली. मुस्लिम कालगणनेनुसार नववा महिना असलेल्या रमजानच्या अखेरीस चंद्र दर्शनानंतर शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी ईद-उल-फित्र साजरी केली जाते.
मनोर, टेन, टाकवाहाल, काटाले, सोनावे आणि दहिसर तर्फे मनोर गावातील मुस्लिम वस्तीत मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. सकाळी सामूहिक नमाज पठण केल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेत मुस्लिमांनी ईद मुबारक म्हणत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान ईदनिमित्त प्रत्येकाच्या घरी शीरखुरमा तयार करण्यात आला होता. घरी येणाऱ्या प्रत्येकाला शीर खुरमा, मिठाई दिली जात होती. लहानगे पारंपरिक वेष परिधान करून थोरामोठ्यांकडे ईदी मागण्याचा हट्ट करताना दिसले. या वेळी मनोर पोलिसांकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुलाबपुष्प देत पोलिसांनी मुस्लिमांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. मनोर मशिदीसमोर पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com