दिगंबर गवळी यांचे एकल चित्रप्रदर्शन

दिगंबर गवळी यांचे एकल चित्रप्रदर्शन

वसई, ता. २३ (बातमीदार) ः वसई विकासिनी संचालित रॉबी डिसिल्वा दृक कला महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य दिगंबर गवळी यांच्या सातव्या एकल चित्रकलेचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरविण्यात आले होते. हे प्रदर्शन तीन दिवस खुले ठेवण्यात आले होते. बियांड आर्ट गॅलरी प्रमुख विभू कपूर यांच्या हस्ते कला प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी मुंबई आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, चित्रकार मधुकर मुंडे, अविनाश मोकाशी, जे. जे. अकादमीचे प्राचार्य सुरेंद्र जगताप, परशुराम सुतार, किरण अदाते, शिल्पकार मधुकर वेजारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com