एपीएमसीतील वर्चस्व मोडीत काढा

एपीएमसीतील वर्चस्व मोडीत काढा

सरळगाव, ता. २४ (बातमीदार) : मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेली अनेक वर्षे माजी आमदार गोटीराम पवार यांचे वर्चस्व आहे. ते वर्चस्व मोडीत काढा, असे आवाहन भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी मतदारांना केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले भाजप-शिवसेना हे दोन्ही पक्ष मात्र मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमनेसामने आल्याने या निवडणुकीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. गेली अनेक वर्षे या कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार गोटीराम पवार यांनी आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. मात्र या वेळी भाजपचे आमदार कथोरे यांनी या निवडणुकीत आपले पॅनेल उभे केल्याने या निवडणुकीची रंगत वाढली आहे.
कथोरे यांनी शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेल; तर माजी आमदार गोटीराम पवार यांनी शेतकरी सहकार पॅनेलच्या नावाखाली आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी आमदार कथोरे स्वतः; तर माजी आमदार पवार यांचे पुत्र सुभाष पवार हे जातीने लक्ष ठेवून आहेत. १८ जागांसाठी ही निवडणूक होणार असली, तरी अडत या एका जागेसाठी एक संचालक बिनविरोध निवडून आल्याने प्रत्यक्षात १७ जागांसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान होणार आहे. या निवडणुकीत शेतकरी सोसायटीमधून ११, ग्रामपंचायतीमधून चार व व्यापारी वर्गातून दोन असे एकडू १७ जागेसाठी निवडणूक होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com