Fri, Sept 22, 2023

बेडीसगावात वसुंधरा दिनानिमित्त जनजागृती
बेडीसगावात वसुंधरा दिनानिमित्त जनजागृती
Published on : 24 April 2023, 11:44 am
खर्डी, ता. २४ (बातमीदार) : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पंचायत समिती शहापूर यांच्या वतीने बेडीसगाव जिल्हा परिषद शाळेत जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धोक्यात आलेली पृथ्वी, वातावरणातील असमानता, वाढते प्रदूषण व पृथ्वीचे संरक्षण याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, चित्रकला रांगोळी स्पर्धा घेऊन विजेत्यांना केंद्रीय संचार ब्यूरो नाशिक यांच्या वतीने पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी एस. बी. मलखेडकर, समाधान हेंगडे पाटील, शाहीर सुधाकर आरविल, कमल हरणे, मुख्याध्यापक गोविंद सापळे, ग्रामसेवक एस. व्ही. भोईर, समाजसेवक रवींद्र खाडे, पोलिस पाटील प्रगती विशे यांच्यासह ग्रामस्थ, महिला, युवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश विशे यांनी केले.