उल्हासनगर महापालिकेची पुस्तके दान करण्याची हाक

उल्हासनगर महापालिकेची पुस्तके दान करण्याची हाक

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर. ता. २५ : गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कामी येणारी आणि पडून राहणारी महागडी पुस्तके दान करा, अशी हाक उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे. त्यासाठी महाविद्यालय व खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना रद्दीत पुस्तके विकण्याचे टाळून पुस्तकांचे दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापपालिका आयुक्त अजिज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, प्रशासन अधिकारी अशोक मोरे, लेखापाल निलम कदम बोडारे, समग्र शिक्षा अभियानचे योगेश मराठे यांनी ही मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे.
महापालिका शिक्षण विभाग कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात महानगरपालिकेच्या २२, खाजगी अनुदानित ९१ विना अनुदानित ८१ अशा एकूण १९४ शाळा आहेत. तसेच अनेक महाविद्यालये आहेत. या सर्व शाळांमधील व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांची जुनी पुस्तके संकलित करून ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व पालिकेच्या शाळेत जमा करण्यास सांगण्यात आले आहे.
अनेक विद्यार्थी दरवर्षी आपली वापरलेली पुस्तके रद्दीत देतात. हजारो पुस्तके वापरण्यासारखी असताना देखील नव्या पुस्तकांच्या हट्टापायी जुनी पुस्तके रद्दीत देऊन नवी पुस्तके घेतली जातात. या पुस्तकांचा गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होण्याकरिता पुस्तके दान करणे ही काळाजी गरज असून पालकांनी विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे आणि रद्दीत पुस्तके विकण्याचे टाळावे असे आवाहन अशी खंत आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.
....
पर्यावरण संवर्धनासाठी मोहिम
कागदांसाठी वृक्षांची कत्तल केली जाते. पर्यावरण संरक्षण करण्यासाठी कागदांचा कमी वापर केला पाहिजे. दरवर्षी जुन्या पुस्तकांच्या स्वरूपात रद्दीत जाऊन हजारो नवीन पुस्तके छापली जातात. पर्यावरण संरक्षण करण्यासाठी जुन्या पुस्तकांच्या वापराला प्रोत्साहन दिले पाहिजे या विचाराने ही मोहीम राबविण्यात येत आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
...
पाठ्यपुस्तके व इतर संदर्भांची जुनी पुस्तके, गाईड्स, व्यवसायमाला, गोष्टींची पुस्तके, साहित्यिक ग्रंथ संपदा रद्दीत न देता पुन्हा वापरासाठी ती महापालिका शाळांमध्ये जमा करावी. त्यामुळे ही पुस्तके योग्य व्यक्तींपर्यंत पोहचवली जातील. यासाठी हा ‘पुस्तक दान’ संकल्प केला आहे.
- अजीज शेख, आयुक्त, उल्हासनगर महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com