तुंगारेश्‍‍वर आश्रमाला मुख्यमंत्र्यांची भेट

तुंगारेश्‍‍वर आश्रमाला मुख्यमंत्र्यांची भेट

विरार, ता. २७ (बातमीदार) : सिद्ध बालयोगी सदानंद महाराज यांनी समाज सुधारण्यासाठी आणि वनौषधी संगोपनासाठी विशेष कार्य केले आहे. त्यांनी ज्ञानेश्वरी देश-विदेशांतही पोहोचविली. त्‍यांच्‍या संस्थेला आवश्यक सर्व सुविधा पुरवण्याबाबत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. वसईतील तुंगारेश्वर येथील बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे हे तुंगारेश्वर येथे आले होते.
कोरोना काळात बालयोगी सदानंद महाराज संस्थेने परिसरातील लोकांसाठी उत्तम कार्य केले आहे. सर्वसामान्यांच्या दुःखात धावून जाणे ही परंपरा त्यांनी जोपासली. चांगल्या गोष्टींसाठी बाबांनी आशीर्वाद दिले आहेत. आमचे सरकार देखील सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी जे जे निर्णय घेणे आवश्यक आहेत ते आम्ही आतापर्यंत घेतले आहेत. भविष्यातही सर्वसामान्यांचा विचार करूनच आवश्यक ते निर्णय घेतले जातील. बाबांचे हे कार्य निरंतर चालू राहणार, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
मी या आश्रमामध्ये आनंद दिघे साहेबांसोबत येत होतो. ही आठवण आज मुद्दाम मला सांगाविशी वाटते. आश्रम संस्थेकडून भविष्यातही आध्यात्मिक मानवी उन्नतीसाठी आवश्यक असणारे कार्य व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
यावेळी बालयोगी सदानंद महाराज, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, शांताराम मोरे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, वसई-विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, ठाणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com