ट्रकच्या धडकेत एक ठार; दोघे जखमीं

ट्रकच्या धडकेत एक ठार; दोघे जखमीं

कासा, ता. २८ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील धामटणे-पेठ मुख्य रस्त्यावरील धामटणे पेठ हद्दीजवळ ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पेठकडून कासा येथे दुचाकीवरून जाणाऱ्या आंबेदे येथील रुपेश बाबल्या सुर्वे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर नयन ठाकरे व आकाश घरत हे जखमी झाले आहेत. जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावर ट्रक जागीच सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक जप्त केला. या अपघाताचा पुढील तपास कासा पोलिस करत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात तरुणांच्या वाढत्या असुरक्षित स्पोर्ट्स बाईकच्या चालवण्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com