भिवंडीत बोगस महिला डॉक्टरांवर कारवाई

भिवंडीत बोगस महिला डॉक्टरांवर कारवाई

भिवंडी, ता.२८ (बातमीदार) : भिवंडीतील तीन अवैध प्रसूतिगृहे सील करून महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने बोगस महिला डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली. यापूर्वी अशा दोन अवैध प्रसूतिगृह वजा हॉस्पिटलांवर कारवाई झाली होती.
कारवाईमध्ये रिजवाना शफिक अन्सारी, नूरजहाँ इसुब खान व नुसरत सुफियान खान अशा तीन बोगस महिला डॉक्टरांची नावे समोर आली आहेत. त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसताना त्यांनी अलोपॅथी औषधे आणि साहित्याचा वापर करून आपण डॉक्टर असल्याचे भासवून नागरिकांची दिशाभूल करत फसवणूक करीत होते. दरम्यान, महाराष्ट्र नर्सिंग होम अंतर्गत शासनाकडे रजिस्ट्रेशन न करता अनधिकृतरित्या गरोदर मातांची प्रसूती केल्याची तक्रारही शांतीनगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया सुजित फडके यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. मनपाच्या शांतीनगर आरोग्य केंद्रात आलेल्या तक्रारीनुसार फातिमा असदुलाह शेख यांच्या जन्मलेल्या बालकाचा हलगर्जीपणाने मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर, तसेच नसरीन सईदुल शेख (वय २६) या महिलेचा व तिच्या बालकाचा मृत्यू झाल्याची तक्रारीनंतर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बुशरा एजाज सय्यद, नोडल ऑफिसर डॉ. जयवंत धुळे, आरसीएच अधिकारी डॉ. वर्षा बारोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया फडके आणि पंच या पथकाने शांतीनगर भागातील तीन ठिकाणी छापा टाकत अनधिकृतरित्या प्रसूतिगृहे सील केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com