मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेस अटक

मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेस अटक

अंधेरी, ता. २८ (बातमीदार) : एक वर्षाच्या मुलाचे अपहरण करून पळून गेलेल्या एका महिलेस गुन्हा दाखल होताच नागपाडा पोलिसांच्या एका विशेष पथकाने गुरुवारी (ता. २७) अटक केली. सुनिता हुसैन शेख असे या ३० वर्षांच्या महिलेचे नाव असून तिच्याकडून अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलिस कोठडीत असून या अपहरणामागील कारणांचा पोलिस शोध घेत आहेत. २५ वर्षांची तक्रारदार महिला ही भायखळा येथे राहत असून, तिला एक वर्षाचा मुलगा आहे. गुरुवारी रात्री ती तिच्या मुलासोबत नागपाडा येथील क्लिअर रोड, ग्रिल्स ॲण्ड राईस हॉटेलसमोर फुगे विकत होती. यावेळी तिच्या मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. सर्वत्र शोध घेऊनही तिचा मुलगा कुठेच सापडला नव्‍हता. त्यामुळे तिने नागपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. परिसरातील सीसी टीव्ही फुटेज पाहिल्यानंतर एक महिला मुलाला उचलून नेत असल्याचे दिसून आले. त्यानंतर सुनिता शेख या महिलेस काही तासांत पोलिसांनी पायधुनी येथून अटक केली. तिच्या तावडीतून या मुलाची सुखरूप सुटका करून त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. सुनिता ही पायधुनीतील मांडवी पोस्ट ऑफिसजवळील पदपथावर राहते. तिच्यावर अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com