आता ठाण्यात नाकाद्वारे कोरोना लसीकरण

आता ठाण्यात नाकाद्वारे कोरोना लसीकरण

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : गेल्या अनेक महिन्यांपासून आटोक्यात आलेल्या कोरोना आजारामुळे अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली होती. त्यातच गेल्या दिवसांपासून पुन्हा कोरोनाने आपले डोकेवर काढण्यास सुरुवात केल्याने नागरिकांचा ओढा लसीकरण करून घेण्याकडे वळला आहे. अशातच ठाणे पालिकेकडे नाकाद्वारे देण्यात येणारी ‘इन्कोव्हॅक’ ही कोरोना प्रतिबंधक लस उपल्बध झाल्याने आता, शहरातील सहा केंद्रांवर पालिकेने शुक्रवारपासून लसीकरण सुरु केले. तसेच कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनचा बूस्टर डोस देखील देण्यात येत आहे.
ठाणे शहरासह जिल्ह्यातील विविध भागात कोरोनाने डोकेवर काढले आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण हे ठाणे शहरात आढळून येत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कोरोना चाचण्याची संख्या वाढवणे, रुग्ण उपचारासाठी व्यवस्था करणे आदी उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच ज्या नागरिकांनी बूस्टर डोस घेतलेली नाही, ते नागरिक कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर लशीच्या शोधात फिरत आहेत. अशातच ठाणे पालिकेला अडीचशे ‘इन्कोव्हॅक’ या लशींचा साठा उपलब्ध झाला असून शहरातील सहा केंद्रांवर पालिकेने शुक्रवारपासून लसीकरण सुरु केले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कौसा आरोग्य केंद्र, मानपाडा आरोग्य केंद्र, शिळ आरोग्य केंद्र, सीआर वाडीया आणि लोकमान्यनगर आरोग्य केंद्र या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवर ही लस देण्यात येत आहे. दरम्यान, कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेऊन सहा महिने किंवा अधिक काळ झालेल्या ६० वर्षे वयावरील नागरिकांना या लसीचा बूस्टर डोस देण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com