मुरबाडमध्ये आज १३० फूट उंच ध्वजस्तंभाच्या लोकार्पण

मुरबाडमध्ये आज १३० फूट उंच ध्वजस्तंभाच्या लोकार्पण

सरळगाव, ता. ३० (बातमीदार) : मुरबाड शहरात १३० फूट उंचीवर भारतीय राष्ट्रध्वज फडकणार आहे. त्यासाठी ध्वजस्तंभ उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. हा लोकार्पण सोहळा उद्या (ता. १) केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. आमदार किसन कथोरे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या ध्वजारोहणासाठी आमदार फंडातून निधी खर्च केला जाणार असल्याचे कथोरे यांनी सांगितले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुरबाड शहराच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक १३० फूट ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. मुरबाडच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक म्हणून हा राष्ट्रध्वज शहराची नवी शान ठरणार आहे. या कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ध्वजारोहणासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कथोरे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com