पालघरमधील रस्ते होणार गतिमान

पालघरमधील रस्ते होणार गतिमान

बोईसर, ता. ३० (बातमीदार) ः पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने त्यांची अक्षरशः चाळण झाली होती. आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी मिळाल्याने ग्रामीण भागातील रस्ते मजबूत होणार आहेत. त्यामुळे प्रवास गतिमान होण्याबरोबरच प्रवाशांची वेळेची बचत होऊन शारीरिक त्रासातून मुक्तता होणार आहे.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी केंद्र सरकारकडून ११४ कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना-२ अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ते मजबूत करण्यासाठी आणखी अंदाजे १०० कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागणार असून यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील एकूण ९०.६७ किलोमीटर रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. यामध्ये ग्रामीण व दुर्गम भागातील २३ रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांच्या कामासाठी एकूण ७६.२८ कोटी रुपये आणि पाच वर्षांसाठी देखभाल-दुरुस्ती म्हणून ५.१९ कोटी रुपये असा जवळपास ८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया जारी करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने त्यांची अक्षरशः चाळण झाली होती.

----------------
१२ महिन्यांची ठेकेदारांना मुदत
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नागरिक अनेक वर्षे प्रतीक्षा करीत होते. अखेर पंतप्रधान ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना- २ अशा दोन्ही योजना मिळून जवळपास १९६ कोटींचा मोठा निधी पालघर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी खर्च होणार आहे. या कामांमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण, लहान-मोठे पूल बांधणे आणि डांबरीकरण यांचा समावेश असून ठेकेदारांना १२ महिन्यांत कामे पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.

----------------------
तालुकानिहाय होणारे रस्ते
१) पालघर- आगरवाडी ते नगावे, गुंदले ते करवेला, मथाणे ते एडवण, तामसई ते पोचाडे, करवाळे ते कांदळवन नवघर, चिंतूपाडा ते दासगाव, वाकसई-दर्भी पाडा रस्ता, इजिमा, तारापूर, घिवली
२) वाडा - कादीवली-करंजे रस्ता, राज्य मार्ग ३४ ते खरीवली रस्ता, वरसाळे ते नवापाडा, सरस ओहोळ ते आलमान
३) जव्हार - दखन्याचा पाडा ते उंबरपाडा (मानमोहाडी), वडपाडा ते भाटेपाडा ते मनमोहाडी रस्ता
४) वसई - भिनार ते केळीचा पाडा, जांभूळपाडा ते मडकेपाडा, करजोन ते कोळोशी, आडणे ते हत्तीपाडा
५) डहाणू - वरोती ते वांगर्जे ते पिंपळशेत बु., गांगोडी ते शेणसरी
६) तलासरी - कुर्झे गावितपाडा ते भुसारापाडा, वडवली डोंगरीपाडा ते केळीपाडा
७) मोखाडा - वेहेळपाडा ते केगवा, नांदगाव राजेवाडी ते भुरीतेक, राजनपाडा, पिंपळपाडा ते इजिमा ४६

------------------
शासनाने मंजूर केलेले रस्ते पालघर जिल्‍ह्यातील ग्रामीण रस्त्यांना चालना देणारे ठरणार आहेत. मंजूर निधीतून दर्जेदार रस्त्यांसाठी प्रयत्न करणार.
- के. डी. गाडगीळ, कार्यकारी अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com