शहापुरात ९६.४ मतदान

शहापुरात ९६.४ मतदान

खर्डी, ता. ३० (बातमीदार) : शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी (ता. ३०) पार पडली. यात ९६.४ टक्के मतदान झाले. सेवा संस्थेत ७८५ पैकी ७७८ (९९टक्के), ग्रामपंचायतमध्ये ९०५ पैकी ८९० (९८ टक्के) व व्यापारी २८८ पैकी २७९ (९७ टक्के) मतदान झाले आहे.

महाविकास आघाडीविरोधात शिवसेना-भाजप युतीत सरळ लढत झाल्याचे बोलले जात आहे. काही मातब्बर अपक्ष उमेदवार असल्याने विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संध्याकाळी ७ वाजले तरी कोणताही निकाल आलेला नव्हता. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com